-
'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वांच लोकप्रिय शो आहे. या शोमुळे कॉमेडियन कपिल शर्माच्या लोकप्रियतेत व कमाईत प्रचंड वाढ झाली.
-
कपिल शर्मा सोबतच या शोमध्ये काम करणाऱ्या इतर कलाकारांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात..
'रिपब्लिक वर्ल्ड' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार कपिल शर्माची एकूण संपत्ती जवळपास २०० कोटींच्या आसपास आहे. २०१९ मध्ये फोर्ब्जच्या सर्वांधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत कपिलचा समावेश होता. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली. अर्चनाने याआधीही अनेक कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलंय. ५७ वर्षीय अर्चनाची एकूण संपत्ती सुमारे २२२.३४२ कोटी इतकी आहे. किकू शारदाने जवळपास १८ मालिकांमध्ये काम केलंय. किकूची एकूण संपत्ती ही सात कोटी ते ३८ कोटी यांदरम्यान आहे. सुमोना चक्रवर्तीने वयाच्या ११ व्या वर्षापासून चित्रपटांत काम केलंय. बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. सुमोनाची एकूण संपत्ती सुमारे ३० कोटी इतकी आहे. कपिल शर्माचा बालमित्र चंदन प्रभाकर हा द कपिल शर्मा शोमधूनच नावारुपास आला. त्याआधी त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३ मध्ये भाग घेतला होता. चंदन प्रभाकरची एकूण संपत्ती पाच ते सात लाख इतकी आहे.

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर