-
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे बंद करण्यात आलेलं चित्रपट व मालिकांचं शूटिंग अखेर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र चित्रीकरण सुरु होताच मालिकांच्या सेटवर देखील करोना रुग्ण सापडू लागले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच 'कसौटी जिंदगी की -२' या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री आमना शरीफ हिच्या सहकाऱ्याला करोनाची लागण झाली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी आमनाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. क्वारंटाईनमध्ये असलेल्या आमनामुळे मालिकेचं चित्रीकरण थांबू नये म्हणून निर्मात्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आमना आता सेटवर न येता आपल्या घरातूनच चित्रीकरण करणार आहे. यासाठी निर्मात्यांची तिच्या घरात चक्क मालिकेचा सेटच उभा केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आमना शरीफ 'कसौटी जिंदगी की या मालिकेत कमोलिका ही व्यक्तिरेखा साकारते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालिकेत ती मुख्य खलनायिका असल्यामुळे तिचे सीन्स टाळता येणार नाही. शिवाय क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे तिला घराबाहेरही पडता येणार नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी निर्मात्यांनी तिच्या घरातूनच चित्रीकरण करण्याची तयारी सुरु केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आमना शरीफने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाचे ४८ हजार ६६१ रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारांनजीक रुग्णवाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी ३६ हजार १४५ रुग्ण करोनामुक्त झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बरे झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाख ८५ हजार ५७६ झाली असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चार लाख ६७,८८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये चार लाख ४२ हजार २६३ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यापैकी तीन लाख ६२ हजार १५३ चाचण्या सरकारी, तर ७९,८७८ चाचण्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केल्या गेल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ चाचण्या झाल्या असून १० लाख लोकांमागे ११,८०५ चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे देण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे करोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे करोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे करोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…