-
तारक मेहता का उल्टा चष्मा या धमाल विनोदी मालिकेतील बबिता अय्यरला सारेच ओळखतात.
-
बबिताचं पात्र बंगाली अभिनेत्री मूनमून दत्ता साकारते. मुनमुनपेक्षाही ती बबिता नावानेच जास्त ओळखली जाते.
-
लॉकडाउनच्या अटी शिथिल झाल्यानंतर 'तारक मेहता…' मालिकेचं पुन्हा चित्रीकरण सुरू झालं असून लवकरच मालिका ३००० भाग पूर्ण करणार आहे.
-
'तारक मेहता…' मालिकेतील तिच्या प्रसिद्ध व्यक्तिरेखेमुळे तिचे सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोअर्स आहेत.
-
बबितादेखील तिच्या चाहत्यांना आपल्याबद्दलच्या अपडेट्स वेळोवेळी इंस्टाग्राम पोस्टच्या मार्फत देत असते.
-
प्रत्येक अभिनेत्रीचं कोणी ना कोणी क्रश असतात. अभिनेत्री ते क्रश एखाद्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतात.
-
टीव्ही टाइम्सच्या वृत्तानुसार, नुकतीच बबिताने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिच्या क्रशबद्दल सांगितलं.
-
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान या तिचा क्रश आहे हे तर तिने अनेक वेळा सांगितलंच आहे.
-
यावेळी मात्र एक क्रिकेटपटूदेखील बबिताला खूप आवडतो असं तिने सांगितलं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांपैकी कोणताही क्रिकेटपटू तिचं क्रश नाहीये.
-
बबिताचा आवडता क्रिकेटपटू पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आहे. तिनेच मुलाखतीत याबद्दल सांगितलं असून ती शोएबची मोठी चाहती असल्याचेही तिने म्हटले आहे.

बँक बॅलेन्स डबल..आलिशान कार…घर…७ ऑक्टोबरपासून ‘या’ ४ राशी होणार करोडपती! बुध-यम केंद्र राजयोग स्वप्न पूर्ण करणार