-
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तापसी पन्नू हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. चौकटी बाहेरच्या भूमिका साकारत तापसीने हळहळू जम बसवला. पण एक अभिनेत्री होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. चला जाणून घेऊया तापसीच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…
-
तापसीचे दिल्लीमधील अशोक विहार या शाळेत शालेय शिक्षण झाले.
-
त्यांनतर तिने इंजिनियरींगचे शिक्षण घेतले.
-
तापसीने त्यावेळी व्ही चॅनेलवरील 'गेट गॉर्जियस' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला.
-
या शोमधून तिने तरुणांच्या मनावर राज्य केले.
-
त्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये करिअर करण्यास सुरुवात केली.
-
दरम्यान तिला दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर आल्या. २०१०मध्ये तिने तेलुगू चित्रपटामध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली
-
२०१३मध्ये तिने 'चष्मेबद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचे 'पिंक', ‘बदला’,‘गेम ओव्हर’,‘मिशन मंगल’,‘सांड की आँख’ आणि ‘थप्पड’ हे बॉलिवूड चित्रपट हिट ठरले.
-
तापसी सध्या बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री असून सध्या तिच्या हातात अनेक चित्रपटांचे ऑफर्स आहेत.
-
‘रश्मी रॉकेट’, ‘शाबाश मिठ्ठू’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘लूप लपेटा’ असे काही तिचे चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट