मराठी इंडस्ट्रीती चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुबोध भावे. ‘नवरा असावा तर असा’ या चॅट शोमध्ये सुबोधने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या होत्या. कॉलेजमध्ये असताना आपण प्रेयसीला रक्ताने पत्र लिहिल्याचा धक्कादायक खुलासाही सुबोधनं यावेळी केला होता. सुबोधनं बालमैत्रीण मंजिरी हिच्याशी लग्न केलं. शालेय वयापासून सुबोधला मंजिरी आवडत होती. तिला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यावर तिनेही सुबोधला होकार दिला. -
त्यांचं हे प्रेमप्रकरण बरीच वर्षे सुरु राहिलं. कॉलेजला असताना सुबोधला सिगारेटचं व्यसन होते. मंजिरीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसे. असंच एकदा ते भेटले असताना सुबोधने सवयीप्रमाणे सिगारेट पेटवली. हे बघताच मंजिरी नाराज होत काहीच न बोलता तिथून निघून गेली. सुबोधला त्याच्या या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. पुन्हा कधी हे व्यसन करायचं नाही हे त्याने मनाशी पक्कं ठरवलं. हेच वचन त्याने मंजिरीलाही दिलं. पण अत्यंत फिल्मी स्टाईलने. त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहून माफी मागितली आणि पुन्हा असं न करण्याचं वचन दिलं. सुबोध सांगतो आजही त्याच्या हातावर त्या जखमेच्या खुणा आहेत. सुबोध आणि मंजिरी वीस वर्षांपासून सोबत आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत. (सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सुबोध भावे )

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल