महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या २० वर्षांपासून महेश बाबू चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच काम केलं आहे. महेश बाबू व त्याची पत्नी नम्रता शिरोडकर सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. या फोटोंमध्ये महेश बाबूच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळते. घरात स्विमिंग पूल असून मुलांसोबत स्विमिंग करण्यासाठी महेश बाबू नक्की वेळ काढतो. घरातील गार्डन एरियासुद्धा प्रशस्त आहे. कुटुंबीयांसोबत गप्पा मारण्यासाठी, निवांत बसण्यासाठी घऱाला लागूनच ही रचना करण्यात आली आहे. मुलांना खेळण्यासाठी प्ले-रुम असून फावल्या वेळेत महेश बाबू त्यांच्यासोबत खेळतो. मुलगी सिताराच्या आवडीनुसार बार्बीच्या चित्रांनी तिची बेडरूम सजवण्यात आली आहे. घराचं इंटेरिअर डिझायनिंग कसं असावं, याची निवड नम्रतानेच केली असून सर्वकाही तिच्या पसंतीनुसार डेकोरेट करण्यात आलं आहे. टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा महेश बाबू हा सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. -
(सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ महेश बाबू, नम्रता शिरोडकर)
-
(सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ महेश बाबू, नम्रता शिरोडकर)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ