-
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'सडक २' या चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी डिसलाईकचा अक्षरश: वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेल्या २४ तासांत ५२ लाखांपेक्षा अधिक डिसलाईक या ट्रेलरला मिळाले आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर डिसलाईक मिळणारा हा पहिला व्हिडीओ नाही. इंटरनेटच्या जगात आणखी सात व्हिडीओ असे आहेत ज्यांना नेटकऱ्यांनी नाकारलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
युट्यूब रिवाईंड २०१८ – हा व्हिडीओ ६ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या व्हिडीओला जळपास एक कोटी ८० डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ८६.३४ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बेबी – पॉपस्टार जस्टिन बिबरने गायलेलं हे गाणं अनेकांचं सर्वात आवडतं गाणं असू शकतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या गाण्याचा व्हिडीओ १९ फेब्रुवारी २०१० मध्ये युट्यूबवर प्रदर्शित झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु त्यावेळी या व्हिडीओला एक कोटी १० लाखांपेक्षा अधिक डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ४४.७३ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
युट्यूब रिवाईंड २०१९ – हा व्हिडीओ ५ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या व्हिडीओला जळपास ९० लाख डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ७२.६९ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बेबी शार्क डांस – हा व्हिडीओ १७ जून २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा व्हिडीओ खास करुन लहान मुलांसाठी तयार करण्यात आला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या व्हिडीओला जळपास ८० लाख डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ३१.३१ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
Учим цвета – हा व्हिडीओ २६ फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या व्हिडीओला जळपास ६० लाख डिसलाईक मिळाले होते. हा व्हिडीओ खास करुन लहान मुलांसाठी तयार करण्यात आला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉनी जॉनी यस पापा – हा व्हिडीओ ६ ऑक्टोंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. जॉनी जॉनी यस पापा या प्रसिद्ध इंग्रजी कवितेचं रिमेक वर्जन तयार करण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा व्हिडीओ खास करुन लहान मुलांसाठी तयार करण्यात आला होता. परंतु या व्हिडीओला जळपास ८० लाख डिसलाईक मिळाले होते. युट्यूबवरील ३१.३१ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कॅन धिस व्हिडीओ गेट्स वन मिलियन डिसलाईक – हा व्हिडीओ प्रसिद्ध प्युडिपायने तयार केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या व्हिडीओद्वारे त्याला डिसलाईकचा विक्रम करायचा होता. या व्हिडीओला ४८ लाख नेटकऱ्यांनी डिसलाईक केलं. युट्यूबवरील ९३ टक्के नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नव्हता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ