-
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आता सर्वाधिक चर्चेत आहे तर त्याचा युरोप दौरा. या दौऱ्यानंतर सुशांतच्या वागणूकीमध्ये मोठा बदल झाल्याचा दावा त्याच्या निटकवर्तीयांकडून केला जात आहे. पण या दौऱ्यामध्ये असं काय झालं की सुशांत एवढा बदलला. याच दौऱ्यासंदर्भात सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने या युरोप दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका विचित्र घटनेचा उल्लेख केला आहे. या दौऱ्यादरम्यान सुशांतने एका ठिकाणी एक फोटो पाहिला आणि ज्यानंतर तो विचित्र वागू लागल्याचा दावा रियाने केला आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान रियाने हा खुलासा केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
-
मात्र असं त्या पेटींगमध्ये काय होतं ज्यामुळे सुशांत एवढा अस्वस्थ झाला. तर रियाने दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली ऑक्टोबर महिन्यात सुशांतबरोबर युरोप दौऱ्यावर असतानाच ते इटलीमधील एका ६०० वर्ष जुन्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा तेथील एका भिंतीवर त्यांना शनी स्वत:च्या मुलाला खात असल्याचे चित्र दिसलं. या कलाकृतीचे नाव Saturn Devouring His Own Child असं आहे. हे चित्र पाहिल्यानंतर सुशांत स्तब्ध झाला.
-
हे चित्र पाहिल्यानंतर एका जागी उभ्या असणाऱ्या सुशांतला रियाने काय झालं असं विचारलं असता त्याने मी या पेंटींगमधील पात्रांना प्रत्यक्षात पाहू शकतोय असं उत्तर दिलं. हे चित्र पाहिल्यानंतरच सुशांतचा वेगवेगळ्या गोष्टी दिसत असल्याचे भास होऊ लागल्याचे रियाने सांगितले. जेव्हा रियाने सुशांतला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो मंत्र उच्चारण करत होता असंही रियाने सांगितलं. ते चित्र पाहिल्यापासून सुशांत कायमचा बदलून गेला असंही रियाचे सांगितलं.
-
रियाने ज्या चित्राबद्दल सांगितलं आहे ते Saturn Devouring His Own Child नावचं चित्र फ्रान्सिस्को दी गोया या चित्रकाराने बनवलं आहे. गोया हे स्पेनमधील प्रसिद्ध चित्रकार होते. गोया यांनी शनी आपल्या मुलालाच खात असल्याचे चित्र ग्रीक दंतकथेच्या आधारावर बनवलं होतं. या दंतकथेनुसार क्रोनस म्हणजेच शनीने भीतीमुळे स्वत:च्याच मुलाला खाल्लं होतं. जन्माला आलेल्या आपल्या दोन मुलांना त्याने खाल्लं होतं. गोया यांनी याच दंतकथेच्या आधारे एका लहान मुलाचे मुंडके तोंडात पकडून उभ्या असणाऱ्या क्रोनसचे चित्र भिंतीवर साकारलं होतं. नंतर त्या चित्राची फ्रेम करुन ते जतन करण्यात आलं. (Photo: Museo del Prado)
-
काय आहे ही ग्रीक दंतकथा > ग्रीक दंतकथेनुसार क्रोनसला त्याचा मुलगाच गादीवरुन पायउतार होण्यास भाग पाडेल असं सांगण्यात आलं होतं. ज्याप्रमाणे क्रोनसने आपले वडील कॅसील यांना गादीवरुन खाली खेचत स्वत: तिथे विराजमान झाला तसचं त्याच्याबरोबर होणार असल्याचं त्याला सांगण्यात आलेलं. त्यामुळेच आपल्याबरोबर असं होऊ नये म्हणून तो जन्माला आलेल्या त्याच्या प्रत्येक मुलाला खात होता. (Photo : wikimedia commons)
-
क्रोसनने स्वत:ची दोन मुलं खाल्ली. मात्र त्याची पत्नी ऑप्स हिने त्यांचा तिसरा मुलगा ज्युपिटरला क्रीटी बेटावर लपवले. क्रोनसने जेव्हा मुलगा कुठे आहे असं विचारलं तेव्हा तिने त्याच्या हातामध्ये कापड गुंडाळलेला दगड दिला. त्यानंतर पुढे याच मुलाने क्रोनसला गादीवरुन खाली खेचत सत्ता ताब्यात घेतली. (Photo : wikimedia commons)
-
फ्रान्सिस्को दी गोया यांनी एकूण १४ चित्र काढली होती. मात्र त्यांनी एकाही चित्राला नावं दिलं नव्हतं. त्यांच्या सर्व चित्रांना नंतर नावं देण्यात आली. ही सर्व चित्र त्यांनी घऱातील भिंतीवर काढली होती. नंतर माद्रीदमधील एका संग्रहालयाने त्यांचे फ्रेमच्या माध्यमातून संवर्धन केलं. (Photo : wikimedia commons)
-
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या ट्विटर अकाउंटवरील कव्हर फोटोही चर्चेत आला होता. या कव्हर फोटोवरुन सुशांत हा मानसिक तणावाखाली असल्याचे संकेत त्याने दिले होते असं बोललं जातं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर या कव्हर फोटोसंदर्भात सोशल मिडियावर जोरदार चर्चा झाली. यासंदर्भात अनेक ट्विटसही करण्यात आले होते.
-
सुशांतने ट्विटवरवर कव्हर फोटो म्हणून ठेवलेलं हे चित्र पश्चिमात्य कलेवर तगडा प्रभाव असणारे पॉलिश चित्रकार व्हिनसेन्ट व्हॅन गोव्ह यांनी काढलं आहे. त्यांनी त्यांच्या आय़ुष्यामध्ये दोन हजारहून अधिक चित्र काढली होती. मात्र सर्वाधिक चित्र त्यांनी मृत्यूपूर्वीच्या एका वर्षाच्या कालावधीत काढली होती. गोव्ह यांनीच काढलेले ‘स्टेअरी नाइट्स’ नावाचे चित्र सुशांतने ट्विटवर कव्हर फोटो म्हणून ठेवलं होतं.
-
२९ जुलै १८९० रोजी गोव्ह यांनी बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. ते दक्षिण फ्रान्समधील एका उपचार केंद्रावर मानसिक तणावाशी संबंधित आजारामुळे उपचार घेताना त्यांनी १८८९ साली जी चित्र काढली होती त्यामध्ये ‘स्टेअरी नाइट्स’चाही समावेश होता. गोव्ह यांच्या वागण्यामध्ये बदल झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. भ्रम आणि आत्महत्येसंदर्भातील विचार करत असल्याने त्यांना असायलम म्हणजेच बंदीगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. (Photo : wikimedia commons)
-
सुशांत ट्विटरवर फारसा सक्रीय नव्हता. त्याने २७ डिसेंबर रोजी शेवटचं ट्विट केलं आहे. त्यामुळेच तो मागील काही महिन्यांपासून मानसिक ताणवाच्या त्रासाला तोंड देत असल्याचे बोललं जातं आहे. सुशांत हा कला विश्वातील अनेक गोष्टींबद्दलचा जाणकार होता. त्याचा वाचनाची आणि कलेची आवड होती. त्यामुळेच त्याने काहीतरी विशिष्ट हेतूने हा कव्हर फोटो ठेवला असणार अशी चर्चा सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर सुरु होती
-
गोव्ह यांच्या चित्रांशी संबंधित वेबसाईटवर स्टेअरी नाइट्स या चित्राचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे. “या चित्राची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चित्र पूर्णपणे व्हॅन गोव्ह यांच्या कल्पनाशक्तीमधून रेखाटलेलं आहे. त्यांच्या खिडकीतून किंवा त्यांना ठेवण्यात आलेल्या सेंट पॉल येथील कोणत्याही नैसर्गिक दृष्याशी हे चित्र साधर्म्य साधणारं नाहीय. त्यांना जे दिसतं ते साकारण्याची सवय असणाऱ्या व्हॅन गोव्ह यांच्या ठराविक चित्रांपेक्षा हे चित्र अनेक अर्थांनी वेगळं आहे,” असं या चित्राचं वर्णन वेबसाईटवर करण्यात आलं आहे. याच चित्राचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. (Photo : Twitter/SanitizerBottlePic)
-
एनसीबीआय म्हणजेच अमेरिकेतील मेडिसीन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार व्हॅन गोव्ह यांना मॅनिक डिप्रेशनचा त्रास होता. सामान्यपणे कला क्षेत्रातील व्यक्तींना या मानसिक आजाराचा अधिक त्रास होतो असं सांगितलं जातं.
-
“सडक २ मधील भूमिकेसंदर्भात बोलण्यासाठी सुशांत आणि भट्ट यांची भेट झाली होती. भेटीदरम्यान अवघ्या काही मिनिटांमध्येच दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु झाल्या. सुशांत खूप बोलका होता. तो अगदी फिजिक्सपासून ते चित्रपटांपर्यंत कोणत्याही विषयांवर सहज बोलायचा,” असं सेनगुप्ता म्हणाल्या होत्या.
-
सुशांतच्या मृत्यूनंतर आणखीन एक धक्कादायक बाब समोर आलेली ती म्हणजे माणसं दिसल्याचे भास व्हायचे. महेश भट्ट यांच्या सहकारी आणि लेखिका सुहरिता सेनगुप्ता यांनी यासंदर्भातील धक्कादायक खुलासा केला होता. तो एका प्रोजेक्टसाठी महेश भट्ट यांना भेटला होता अशी माहिती देतानाच सेनगुप्ता यांनी सुशांतचा मानसिक आजार हाताळण्याबाहेर गेला होता, असंही सांगितलं.
-
सुशांतच्या बोलण्यात सतत झळकणारी उदासीनता भट्ट यांच्या नजरेतून सुटली नाही. “सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर चालला आहे हे त्यांनी ओळखलं. मात्र औषधांशिवाय यावर काहीच उपचार नाही हे ही ठाऊक होतं. निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने (चक्रवर्ती) अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं,” असंही सेनगुप्ता यांनी सांगितलं.
-
-
“यानंतर रिया सुशांतबरोबर राहण्यास घाबरु लागली. तिच्याकडे पर्यायच उपलब्ध नव्हता. भट्ट यांनी तू काहीही करु शकत नाही असं तिला सांगितलं. तू त्याच्याबरोबर राहिलीस तर तुझ्याही विवेकबुद्धीवर परिणाम होईळ असं त्यांनी तिला सांगितलं. सुशांतच्या बहिणीने येऊन सुशांतची काळजी घेण्यास सुरुवात करेपर्यंत रिया त्याच्या सोबत राहिली. सुशांतची बहिणीनेही त्याला हवा तो सर्व पाठिंबा देण्यास आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो त्याची औषधे घ्यायचा नाही,” असंही सेनगुप्ता यांनी स्पष्ट केलं होतं.
-
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सात आणि आठ ऑगस्ट रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकची दिवसभर चौकशी केली. शोविक आणि सुशांतसिंह राजपूत यांनी दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांमध्ये दोघे संचालकपदावर होते. ईडीने सुशांतच्या चार बँक खात्यांच्या घडलेल्या प्रत्येक व्यवहारांची बारकाईने तपासणी के ली. तसेच सुशांतने कु टुंबियांच्या नावे सुरू के लेल्या नियत ठेव/मुदत ठेव (फिक्स डिपॉझीट) खात्यांचेही तपशील तपासले. संचालक असलेल्या तीन कं पन्यांची निर्मिती, त्यातील गुंतवणूक, कंपन्यांचा व्यापार, नफा-तोटा आदी बाबीही तपासल्या. त्याआधारे ईडीने रिया आणि तिच्या कटुंबियांकडे विशेषत: भाऊ शौविक आणि वडील इंद्रजीत यांची चौकशी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे देण्यात आला आहे.
-
ईडीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची एक्स मॅनेजर असणाऱ्या श्रुती मोदीने रियाच सुशांतच्या वतीने अनेक आर्थिक आणि प्रोफेश्नल निर्णय घ्यायची असं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ‘सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करुन लागल्यानंतर काही महिन्यांनी माझी त्यांच्याशी कामानिमित्ताने ओळख झाली. मला त्यांच्या आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर बेकायदेशीर देवाणघेवाणीसंदर्भात कोणतीच कल्पना नाहीय. मात्र रिया ही सुशांतच्या वतीने अनेक निर्णय घ्यायची. यामध्ये अगदी आर्थिक निर्णयांपासून ते प्रोफेशनल (चित्रपटांसंदर्भातील) निर्णयांपर्यंत सर्वच प्रकारच्या गोष्टींचा समावेश होता,’ असं श्रृतीने सांगितल्याचं वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिलं आहे. (श्रृती मोदीचा फोटो Viral Bhayani च्या सौजन्याने)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ