-
१५ ऑगस्ट १९७५ हाच तो दिवस होता ज्यादिवशी शोले नावाचा माईलस्टोन सिनेमा रिलिज झाला. हा सिनेमा अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.. हा सििनेमा आज ४५ वर्षांचा झाला जाणून घ्या या सिनेमाबाबत काही खास गोष्टी (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस आणि जनसत्ता)
-
शोलेचं दिग्दर्शन केलं रमेश सिप्पी यांनी तर निर्माते होते जी.पी. सिप्पी. धर्मेंद्र, अमिताभ, संजीव कुमार, अमजद खान, हेमा मालिनी, जया भादुरी, ए.के. हंगल, अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. ही एक सूडकथा आहे. हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोन ठरला आहे
-
या सिनेमातली सगळी पात्र मग तो सुरमा भुपाली असो किंवा जेलर उत्तम वठली..पण लोकांच्या आजही लक्षात आहे तो क्रूर गब्बर सिंग.. गब्बरच्या रोलसाठी अमजद खान हे पहिली चॉईस नव्हते. हा रोल डॅनी यांना देण्याचा विचार होता. पण अमजद खान यांचं नाव फायनल झालं आणि पुढे काय घडलं ते आपण जाणतोच.
-
असरानी यांनी जेलरची भूमिका साकारली.. हम अंग्रेजोके जमानेके जेलर है म्हणत जी काही धमाल त्यांनी सिनेमात केली आहे त्याला जवाब नाही
-
असरानी यांच्याइतकेच लक्षात राहिले ते जगदीप आणि त्यांचं सुरमा भोपाली हे पात्र अरे ऐसे कैसे… असं म्हणत जो लहेजा त्यांनी सादर केला तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे. जगदीप यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं
-
सलीम जावेद या अजरामर जोडीने शोलेचं लेखन केलंय.. या दोघांनी आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत. शोले हा त्यांचा सर्वाधिक यशस्वी सिनेमा मानला जातो.. काही कालावधीनंतर मात्र हे दोघेही ही अंतर्गत कलहामुळे वेगळे झाले.
-
राहुल देव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन यांचं संगीत या सिनेमाला लाभलं. टायटल म्युझिक असो, होळीचं गाणं असो. गब्बरच्या एंट्रीचं म्युझिक असो किंवा त्यांनी स्वतः गायलेलं मेहबुबा ओ मेहबुबा हे गाणं असो सगळ्यासाठी एकच शब्द अजरामर
-
ठाकूर बलदेव सिंग संजीव कुमार यांनी अत्यंत ताकदीने साकारला.. ही भूमिका धर्मेंद्र यांना करायची होती. मात्र संजीव कुमार यांना हा रोल मिळाला आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं.
-
या सिनेमाचे प्राण आहेत जय विरु अर्थात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र.. या सिनेमात हे दोघे दोन चोर असतात. ते रामगढला येऊन गब्बरची दहशत कशी संपवतात. ते संपवताना त्यांचं आयुष्य कसं बदलतं हे फार सुंदर पद्धतीने मांडण्यात आलं आहे
-
जय आणि विरुवर चित्रित झालेलं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं तर खासच
-
कालियाच्या भूमिकेत मराठमोळे विजू खोटेही भाव खाऊन गेले आहेत.. तेरा क्या होगा कालिया हा डायलॉग खूपच गाजला होता. एवढंच नाही तर कितने आदमी थे? सूअर के बच्चो, जो डर गया समझो मर गया हे गब्बरचे डायलॉगही हिट झाले.
-
या सिनेमातले अॅक्शन सीन्सही खास होते…फाईट आणि अॅक्शन सीन्स पाहताना आपण आजही दंग होतो
-
विरु आणि बसंती यांचं खुलणारं अवखळ प्रेम याच सिनेमात पाहण्यास मिळालं कोई हसीना जब रुठ जाती है तो औरभी हसींन हो जाती है म्हणत या दोघांनीही रसिकांची मनं जिंकली
-
जयच्या आयुष्यातही राधा येते.. या दोघांची प्रेमकहाणी अत्यंत मॅच्युअर्ड दाखवण्यात आली आहे.. अर्थात ती अधुरीच राहते..
-
ये हात हमको दे दे ठाकूर म्हणत ठाकूरचे हात गब्बर तलवारीने कापतो.. आजवरचा सर्वात थरारक सीन याच सिनेमात आहे.. जय विरुची निखळ दोस्तीही आहे आणि विरुने गब्बरचा घेतलेला बदलाही…
-
आज जब तक है जान जाने जहाँ मै नाचुंगी हे गाणंही तितकंच खास झालंय.. शोले हा सिनेमा आणि त्याची जादू अनेक पिढ्यांवर कायम राहिली.. हा सिनेमा ४५ वर्षांचा झाला तरीही त्याची जादू संपलेली नाही. सिनेमा पाहताना तो आजही आपल्याला तितकाच 'भारी' वाटतो.
-
रामगढ गावके वासीयो गब्बरसे तुम्हे सिर्फ एकही आदमी बचा सकता है.. वो है खुद गब्बर हे अमजद खान ज्या अंदाजात बोलले आहेत त्याला खरोखर जवाब नाही.
-
शोलेने फक्त इतिहासच नाही घडवला हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोन ठरला.. परफेक्ट स्टारकास्ट, परफेक्ट गोष्ट, परफेक्ट मसाला, परफेक्ट अभिनय, परफेक्ट संगीत, परफेक्ट दिग्दर्शन या सगळ्याची जमून गेलेली भट्टी म्हणजे शोले हा सिनेमा हा सिनेमा पाहिला नाही असा ८०, ९० च्या दशकातला आणि त्यापुढचाही माणूस शोधून सापडला नाही. सिनेमा रिलिज होऊन ४५ वर्षे झाली आहेत. मात्र या सिनेमाचं गारुड अद्यापही कायम आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ