'बिग बॉस ७'ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. गौहर खान बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या मुलाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबार व गौहर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या रिलेशनशिपबाबत गौहर किंवा झैदने अद्याप मौन बाळगलं आहे. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. 'बिग बॉस'च्या घरात असताना गौहर खान आणि कुशल टंडन यांचं अफेअर फार चर्चेत होतं. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यावरसुद्धा ही जोडी चर्चेत होती. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ