अभिनेता संजय दत्तला स्टेज ४ फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. त्यामुळे कामातून काही दिवस ब्रेक घेणार असल्याचं खुद्द संजय दत्तने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. संजूबाबा कर्करोगावरील उपचारासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. त्याच्या अनेक चित्रपटांचं काम अर्ध्यावर थांबलं आहे. सडक २ – महेश भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २८ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी बाकी राहिलेल्या डबिंगचं काम संजूबाबाने नुकतंच पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि पूजा भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. तोरबाज- हा चित्रपट अफगाणिस्तानमधल्या सुसाइड बॉम्बर्सवर आधारित असल्याचं कळतंय. यामध्ये संजूबाबा आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार असून चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. भुज : द प्राइड ऑफ इंडिया- अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्तची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपटसुद्धा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. केजीएफ: चॅप्टर २- बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेल्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं थोडंसं शूटिंग बाकी असल्याचं कळतंय. शमशेरा – यश राज फिल्म्स बॅनरअंतर्गत या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजूबाबा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची शूटिंग अद्याप पूर्ण झालेली नाही. पृथ्वीराज- अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची मुख्य भूमिका असलेल्या या ऐतिहासिकपटात संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची बरीच शूटिंग बाकी आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार सुमारे ७३५ कोटींचे हे संजूबाबाचे आगामी प्रोजेक्ट्स आहेत. संजय दत्त कामातून ब्रेक घेणार असल्याने आता या सर्व प्रोजेक्ट्स कसे पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. सर्व छायाचित्र सौजन्य – फेसबुक, संजय दत्त

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…