-
दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झालं आहे. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी लीव्हर सोरायसीसचा त्रास होता. आज त्यांचे हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. जाणून घ्या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी
-
सातच्या आत घरात या चित्रपटात निशिकांत कामतची भूमिका होती.
-
डोंबिवली फास्ट हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. यातल्या माधव आपटेची कथा यात मांडली होती. एक सामान्य माणूस व्यवस्थेविरोधात जातो तेव्हा काय होतं याचं चित्रण सिनेमात होतं.
-
त्यानंतर आला मुंबई मेरी जान हा सिनेमा.. मुंबईतल्या लोकलमध्ये झालेल्या स्फोटांवर हा सिनेमा आधारीत होता… अत्यंत वेगळा आणि संवेदनशील सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला आहे.
-
निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला लय भारी हा सिनेमा मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला
-
लय भारी या सिनेमादरम्यान निशिकांत कामत आणि रितेश देशमुख यांची चांगली दोस्ती झाली
-
फोर्स हा सिनेमाही निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता
-
रॉकी हँडसम हा जॉन अब्राहमचा हा सिनेमाही निशिकांत कामतने दिग्दर्शित केला होता
-
अजय देवगणचा दृश्यम हा सिनेमाही सुंदर सिनेमा होता… हा सिनेमाही निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता
-
इरफानचा मदारी हा सिनेमाही चांगलाच गाजला याही सिनेमाचे दिग्दर्शक होते निशिाकांत कामत
-
मराठीतला गाजलेला सिनेमा फुगे.. या सिनेमात सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी यांच्या भूमिका होत्या हा सिनेमाही निशिकांत कामत यांनीच दिग्दर्शित केला होता
-
भावेश जोशी या सिनेमात त्यांनी भूमिका साकारली होती..
-
तर डॅडी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हा अविस्मरणीय ठरला
-
मराठीतला एक चांगला नट, चांगला दिग्दर्शक हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा दिग्दर्शक त्याच्या खूप चांगल्या कलाकृती मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेला आहे. एका लय भारी दिग्दर्शकाची अखेर अशा रितीने झाली आहे

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश