
हिंदी चित्रपटसृष्टी आणि शब्दमैफीलींच्या दुनियेमध्ये गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आलेले ‘गुलजार’ यांचा आज वाढदिवस. 
वयाची मर्यादा किंवा बंधने ही या व्यक्तिच्या शब्दसामर्थ्यापलीकडे कधी आलीच नाहीत आणि येणारही नाहीत हेच खरे. 
‘संपूर्ण सिंग कालरा’ हे त्यांचे पूर्ण नाव. या नावाने त्यांची ख्याती नसली तरीही ‘गुलजार’ या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेही अनेकांना सुखद दिलासा मिळतो. 
आर. डी. बर्मन, सलील चौधरी, विशाल भारद्वाज, ए. आर. रेहमान संगीतकारांच्या अशा अनेक पिढ्या बदलल्या, पण ‘गुलजार’ आणि त्यांचे शब्द मात्र अनेक दशके रसिकांची शाब्दिक तहान भागवत आहेत असेच म्हणावे लागेल. 
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुलजार यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 
लेखणीच्या सामर्थ्याचं उत्तम उदाहरण देण्यासाठी नेहमीच गुलजार यांचं नाव पुढे केलं जातं. 
सोशल मीडियावरुन गुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत असून, #Gulzar हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे.
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार