मुंबईतील भायखळा येथे बोमन इराणींचं घर आहे. बोमन इराणी यांनी त्यांचं घर अत्यंत सुंदररित्या सजवलं आहे. या घरात ते जवळपास गेल्या १४ वर्षांपासून राहत आहेत. २००३ मध्ये 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ३५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे बोमन इराणी एकेकाळी वेटरचं काम करायचे. त्यांनी दोन वर्षांपर्यंत मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिसचं काम केलं होतं. वेटर म्हणून कामाला लागल्यावर त्यांच्या आईचा अपघात झाला. त्यामुळे वेटरचं काम सोडून ते आईचं दुकान चालवू लागले होते. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यापासून ते चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापर्यंतचा बोमन यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन कधीच नसतं हे बोमन इराणींच्या स्ट्रगल स्टोरीतून नक्कीच शिकायला मिळतं. (छायाचित्र सौजन्य- rediff.com)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ