'पप्पी दे पारूला' या गाण्यामुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर घराघरात पोहोचली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे स्मिता गोंदकर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. स्मिता गोंदकरने आपल्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या साडीवरील फोटो पोस्ट केले आहेत. या साडीमध्ये स्मिताचं सौदर्य आधिकच खुलून दिसत आहे. स्मिताच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षावदेखील केला आहे. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते. सोशल मीडियावर स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. मुंबईचा डब्बेवाला या सिनेमातून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नुकताच ये रे ये रे पैसा २ चित्रपटात स्मिता गोंदकरने प्रमुख भूमिका साकारली होती. -
सर्व फोटो – स्मिता गोंदकर यांच्या इन्स्टाग्रामववरुन घेतले आहेत.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ