-
भारतीय पारंपरिक पेहरावात नऊवारी साडीचं स्वत:चं असं स्थान आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. पण आता सईचा नऊवारी साडीतला मराठमोळा थाट आणि साज असलेला लूक पाहायला मिळाला. सईने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नऊवारी साडीतील सईचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. निळ्या रंगाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने आणि मोत्याची नथ असा सईचा मराठमोळा थाट या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. मराठमोळी, असं कॅप्शन देत सईने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. सईचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो. तितकाच हा पारंपरिक लूकदेखील चर्चेत आहे. याआधीही सईने नऊवारी पैठणी साडी नेसून फोटोशूट केलं होतं. (सर्व छायाचित्र सौजन्य – सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम, फेसबुक) -
साडीतील सईचे खास फोटो

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ