-
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेमुळे दिशा वकानी आता घराघरात पोहोचली आहे. दयाबेनच्या बोलण्याच्या आणि विनोदाच्या शैलीमुळे तिचे अनेक चाहते बनले आहेत. (फोटो सौजन्य -इंडियन एक्स्प्रेस/जनसत्ता)
-
या मालिकेमुळे दिशा वकानी हे खरं नावच अनेकांना माहिती नाही. सगळे दिशाला आता दयाबेन या नावानेच ओळखतात. दयाबेन भूमिकेत वावरताना दिशानं केलेल्या अभिनयाचे अनेकजण फॅन झाले आहेत. त्या भूमिकेतील तिच्या बोलण्यापासून ते हसण्यापर्यंतच्या शैलीची अनेकजण नक्कलही करण्याचा प्रयत्न करतात.
-
दयाबेन अर्थात दिशा वकानीला हे यश मिळायला सुरूवात झाली २००८नंतर. जेव्हा तारक मेहता मालिका सुरू झाली. या मालिकेनंतर दिशा वकानीला दयाबेन ही नवी ओळखच मिळाली.
-
२००८ पूर्वी दिशा वकानीचं आयुष्य कसं होतं? त्यांना काय संघर्ष करावा लागला?, याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. दिशाला सुरूवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला. कारण तारक मेहतापूर्वी तिला कुणीही ओळखत नव्हतं.
-
गुजरातमधील अहमदाबाद शहरात जन्मलेल्या दिशाने थिअटरच्या माध्यमातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. पण, सुरूवातीला दिशाचा अनुभव फारसा चांगला नाही.
-
दिशानं दिलेल्या माहितीप्रमाणे कितीतरी वेळा तिला कामाचा मोबदलाच मिळत नव्हता. कधी पैसे मिळायचे, तर काम चांगलं नसायचं. पण, दिशाची समस्या अशी होती की, प्रसिद्ध नसल्यानं आवडीचं काम मिळणं अवघड होतं.
-
कामाचा मोबदलाच मिळत नसल्याचा परिणाम असा झाला की, दिशाला चक्क बी ग्रेड सिनेमात काम करावं लागलं. १९९७ मध्ये दिशानं कमसिन द अनटच्ड या सिनेमात भूमिका केली. त्या सिनेमात दिशा अशा भूमिकेत दिसली, जी नंतर कधीही त्यांनी केली नाही. बोल्ड भूमिका दिशाला करावी लागली.
-
खडतर संघर्ष करावा लागला असला, तरी दिशा आपल्या आयुष्याविषयी पॉझिटिव्ह आहे. तिचं म्हणणं आहे की, त्या कठीण काळात खूप काही शिकायला मिळालं.
-
दिशानं अभिनयाविषयी घेतलेल्या कष्टाचं चीज म्हणजे तारक मेहता मालिकेचा भाग ती झाली. सलग ९ वर्ष या मालिकेत काम केल्यानंतर दिशानं ब्रेक घेतला होता. मुलीमुळे मालिकेपासून दूर गेल्याच्या बातम्या आल्या. पण, निर्माता आणि दिशामध्ये मतभेद झाल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या.
-
सप्टेंबर २०१७ मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. त्यानंतर ती मालिकेत परतणार होती. मात्र बाळंतपणानंतर मालिकेत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात तिने मानधनात वाढ करण्याचंही सांगितलं होतं. निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला निवडल्याच्याही गप्पा रंगल्या होत्या. (फोटो सौजन्य -इंडियन एक्स्प्रेस/जनसत्ता)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ