विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे. (सौजन्य : जनसत्ता) ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत गेली. मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच तिच्या लक्झरी लाइफस्टाइलविषयी आणि तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या विद्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं असून मुंबईतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे या दोघांचं घर कोणत्याही राजमहालापेक्षा कमी नाही. मुंबईतील जुहू तारा रोड येथील प्रणेता या इमारतीत विद्या आणि सिद्धार्थ राहतात. जुहू तारा रोड हा मुंबईतील सर्वात पॉश एरिया असून येथे उच्चभ्रु लोका राहतात. विद्याने तिच्या स्वप्नांचा इमला अत्यंत सुंदर पद्धतीने सजवला आहे. विद्याने घरात इटालियन स्टाइलचं इंटेरिअर केलं आहे. विद्या अनेक वेळा सोशल मीडियावर तिच्या घरातले काही फोटो शेअर करत असते. या फोटोवरुन विद्याचं नेमकं घरं किती मोठं असावं याचा अंदाज लावता येतो. जवळपास १२-१३ वर्षांपासून विद्या या घरात राहत असल्याचं सांगण्यात येतं. -
घरातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याकडे विद्याने विशेष लक्ष दिल्याचं या फोटोत दिसून येत आहे
-
घराची रचना आणि सामानांची योग्य ठिकाणी मांडणी यामुळे विद्याचं घरं अत्यंत सुंदर दिसत आहे.
विद्याचा हा स्वयंपाक घरातला फोटो पाहिल्यानंतर तिला स्वयंपाक करण्याची विशेष आवड असल्याचं दिसून येतं.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ