काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेचा प्रोमो वेगळ्याच कारणाने गाजला. प्रोमोमध्ये दाखवलेल्या हिंसक दृश्याविरोधात प्रेक्षकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेता किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. किरणने या मालिकेत एका डॉक्टरची भूमिका साकारली असून सत्य घटनेपासून प्रेरित मालिकेची कथा दाखवण्यात येणार आहे. किरण गायकवाड 'लागिरं झालं जी' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने भैय्यासाहेब नामक खलनायकी भूमिका साकारली होती. आता 'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा किरणच्या अभिनयाची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी किरणचा अभिनेत्री मोनालिसा बागल हिच्यासोबत मुंडावळ्या बांधून उभा असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. किरण आणि मोनालिसाने लग्न केलं की काय अशीच चर्चा सुरू झाली होती. मात्र 'टोटल हुबलक' या मालिकेच्या प्रमोशननिमित्त हा सर्व खटाटोप केल्याचं नंतर स्पष्ट झालं. (सर्व छायाचित्र सौजन्य- फेसबुक, किरण गायकवाड)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ