-
सोशल मीडियावर सध्या 'रसोडे मे कौन था' हा रॅप साँग जोरदार चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेतील कोकिलाबेन आणि तिची सून गोपी बहु यांच्यातील संवादांवरून हा मजेशीर रॅप साँग तयार करण्यात आला आहे. 
यशराज मुखाटे या तरुणाने हा रॅप साँग तयार केला असून त्यामुळे तो रातोरात प्रकाशझोतात आला आहे. 
यशराज मुखाटे संगीतकार असून 'रसोडे मे कौन था' या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या तुफान वाढली. 
यशराजचा हा व्हिडीओ ट्विटरवरही ट्रेण्ड झाला आणि त्यावरून अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाले. 
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनीसुद्धा यशराजचा हा व्हिडीओ शेअर केला. 
त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याची वाहवा केली. 
तू खूप प्रतिभावान आहेस, अशीच प्रगती कर… म्हणत अभिनेता राजकुमार रावने यशराजला कौतुकाची थाप दिली. 
अरमान मलिक, फातिमा सना शेख यांनीसुद्धा त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. 
यशराजने याआधीही असे मजेशीर व्हिडीओ बनवले आहेत. मात्र कोकिलाबेनचा व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष आवडला. 
यशराजने बॉलिवूडच्या अनेक गाण्यांना रिक्रिएट केले आहेत. 
याआधी 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' या विकी कौशलच्या चित्रपटातील 'हाऊज द जोश'चा रिक्रिएशन व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. 
'साथ निभाना साथियाँ' या मालिकेतील कलाकारांनीही व्हिडीओचं कौतुक केलं आहे. 
या व्हिडीओत रुपल पटेल अर्थात कोकिलाबेन त्यांची सून गोपी बहु आणि राशीला ‘रसोडे मे कौन था’ असा प्रश्न विचारते. या संवादांवरून मजेशीर रॅप साँग तयार करण्यात आला आहे. 
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, यशराज मुखाटे)
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा