-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालाल, दयाबेनच्या जोडीने लोकप्रिय असलेले आणखी एक पात्र म्हणजे अंजली मेहता. तब्बल १२ वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेतून आता नेहा मेहता बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे यापुढे आपल्याला त्या तारक मेहता या मालिकेमध्ये दिसणार नाहीत. ( सौजन्य – नेहा मेहता इन्स्टाग्राम)
-
मालिकेत तारक मेहता यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अंजली यांचे मूळ नाव नेहा मेहता आहे. त्यांचा जन्म नऊ जून १९७८ रोजी झाला.
-
नेहा मेहताचे पूर्वज गुजरात पाटनचे आहेत. पण त्या वडोदरा आणि अहमदाबाद शहरात लहानाच्या मोठया झाल्या.
-
नेहा मेहताने मास्टर्स इन परफॉर्मिंग आटर्समध्ये पदवी मिळवली आहे. भरत नाटयम नृत्यकलेत त्या पारंगत आहेत.
-
नेहा मेहताचे वडिल लोकप्रिय लेखक आहेत. त्यांनीच आपल्या मुलीला अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
-
नेहा भारतीय क्लासिकल डान्समध्ये करिअर करु शकली त्याचे श्रेय ती तिच्या आई-वडिलांना देते. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तिने पदवी मिळवली आहे.
-
नृत्य आणि दिग्दर्शनामध्ये नेहाला पीएचडी करायची होती.
-
नेहा मेहताने अनेक वर्ष गुजराती रंगमंचावर काम केले आहे.
-
डॉलर बहु या मालिकेतून २००१ साली नेहा मेहताना मालिकाविश्वात पदार्पण केले.
-
'भाभी' या मालिकेत नेहाला महत्वाची भूमिका मिळाली. २००२ ते ०३ दरम्यान तिने या मालिकेत काम केले. नंतर डॉली सोहीने तिची जागा घेतली.
-
२००४ साली 'रात होने को हैं' आणि 'देस में निकला होगा चांद' या मालिकेत नेहाने काम केले.
-
२००१ साली नेहाने गुजराती आणि २००३ साली धाम या तेलगु चित्रपटात काम केले आहे.
-
२००८ साली 'ईएमआय' या हिंदी चित्रपटातही नेहाने काम केले आहे. संजय दत्त, उर्मिला मातोंडकर आणि अर्जुन रामपाल यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. नेहा मेहताना उर्मिलाची वकिल आणि मैत्रीण अशी दुहेरी भूमिका केली होती.
-
२००८ साली नेहा मेहता अभिनयाला रामराम करुन न्यू यॉर्कला फिल्म मेकिंगचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी जाणार होती. पण आयुष्याने तिच्यासाठी काही वेगळेच ठरवले होते. तिला तारक मेहता मालिकेमध्ये काम करण्याची ऑफर आली आणि त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे.
-
नेहा आणि तारक मेहता म्हणजे शैलेश यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल