-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत गेली १२ वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. पण आता ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Photo credi : sunayanaf instagram)
-
'ई टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार तारक मेहता मधील अंजली मेहता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सुनैना फौजदार हिची निवड केली आहे.
-
सुनैना येत्या काही काळात मालिकेत अभिनय करताना दिसेल.
-
-
मात्र तिची या मालिकेत एण्ट्री कशी होणार? याबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.
-
सुनैना एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
-
-
ती तिच्या विनोदी शैलीसाठी विशेष ओळखली जाते.
-
तिने २००७ मध्ये ‘संतान’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
त्यानंतर ‘राईट लेफ्ट राईट’, ‘मित मिलादे रब्बा’, ‘हमसे है लाईफ’, ‘यम है हम’ यांसारख्या अनेक विनोदी मालिकेंमध्ये तिने काम केले आहे.
-
पण ‘सीआयडी’ आणि ‘अदालत’ या क्राईम मिस्ट्री मालिकेंमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.
-
त्यामुळेच तिला ‘तारक मेहता’ सारख्या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली अशा चर्चा रंगल्या आहेत.
-
आता सुनैनाला मालिकेत अंजली मेहताच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
-
पण ती मालिकेत केव्हा दिसणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
-
यापूर्वी अंजली मेहताची भूमिका अभिनेत्री नेहा मेहताने साकारली होती.
-
ती गेली १२ वर्षे मालिकेत भूमिका साकारत होती.
-
-
पण आता तिने मालिका सोडली असून सुनैना भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल