-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने युरोप ट्रीप तसेच दोघांमधील आर्थिक व्यवहारासंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. (फोटो सौजन्य – रिया चक्रवर्ती इन्स्टाग्राम)
-
मी सुशांत सिंह राजपूतच्या पैशावर जगत नव्हते तसेच त्याच्यासोबत केलेल्या युरोप ट्रीपबद्दलही तिने माहिती दिली. याच ट्रीप दरम्यान मला सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल समजले असे तिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
अरूण यादव यांनी सुशांत सिंहबद्दल केलेल्या विधानानंतर बिहारमधील राजकीय नेत्यांनी त्यांच्या टीका केली आहे. यादव यांनी बिहारच्या जनतेची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागावी अशी मागणी भाजपा व जदयूनं केली
-
युरोप ट्रीप दरम्यान सुशांतने हॉटेलचे बिल भरले, त्यावर तिला काहीही आपत्ती नव्हती पण त्या ट्रीपमध्ये सुशांत जितके पैसे खर्च करत होता, त्यावर तिला आक्षेप होता.
-
"पॅरिसमध्ये माझे एक शूट होते. तिथे एक फॅशन शो होता. त्या फॅशन शो साठी मला पॅरिसला बोलावण्यात आले होते. कंपनीने माझे बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते आणि तिथे माझी राहण्याची व्यवस्था केली होती" असे रियाने सांगितले.
-
"माझ्या पॅरिस दौऱ्याच्या निमित्ताने युरोप ट्रीप करता येईल ही सुशांतची कल्पना होती. सुशांतने ते तिकिट रद्द केले आणि फर्स्ट क्लासचे तिकिट काढले. उर्वरित संपूर्ण ट्रीपमध्ये सुशांतने हॉटेलचे पैसे भरले. त्याची इच्छा होती. मला काही आपत्ती नव्हती. तो स्टारसारखा राहत होता. तो जे पैसे खर्च करतोय त्यावर मला आक्षेप होता" असे रियाने सांगितले.
-
युरोप ट्रिपच्या एक-दोन वर्षआधी सुशांत सहा मुलांसोबत थायलंड ट्रीपला गेला होता. तिथे त्या सुट्टीवर त्याने ७० लाख रुपये खर्च केले होते. त्याने एक प्रायवेट जेटही भाडयावर घेतले होते. ती त्याची लाइफ स्टाइल होती असे रियाने सांगितले.
-
त्याने काय करायचं, हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? त्याची मर्जी. तो स्टार सारखा रहायचा. त्याला ती लाइफ स्टाइल आवडायची असे रिया म्हणाली.
-
मी सुशांत सिंह राजपूतच्या पैशावर जगत नव्हते. आम्ही कपल (जोडप्यासारखे) एकत्र राहत होतो असे रेहा म्हणाली.
-
सुशांत विमानात बसण्यापूर्वी मोडाफिनिल नावाचं एक औषध घ्यायचा आणि प्रत्येक वेळी हे औषध तो प्रत्येक वेळी जवळ बाळगायचा. त्यामुळे तो कधीच औषधं घेण्यापूर्वी कोणाशी सल्लामसलत करत नव्हता असे रिया म्हणाली.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल