-
भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
-
महविश हयात असे त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव असून ती दाऊदपेक्षा २७ वर्षांनी लहान आहे. महविश पाकिस्तान अभिनेत्री असून काही लोक तिला गँगस्टर गुडिया नावाने सुद्धा ओळखतात.
-
दाऊदच्या या नव्या गर्लफ्रेंडने पाकिस्तानातील तमाम नेते आणि अभिनेत्यांप्रमाणे काश्मीर मुद्यावर मतप्रदर्शन केले आहे.
-
भारतीय माध्यमांमध्ये तिचे नाव दाऊद सोबत जोडले गेल्याने संतापलेल्या महविश हयातने बरीच आगपाखड केली आहे. तिने टि्वट करुन बॉलिवूडला ढोंगी म्हटले आहे.
-
काही भारतीय माध्यमांमध्ये माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करुन मी आरोपांना मान्यता देणार नाही असे महविश हयातने सांगितले.
-
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दाऊदशी संबंध असल्यानेच मेहविशला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळालं आहे.
-
त्यांचा काय अजेंडा आहे आणि ते हे सर्व का करत आहेत, ते मला माहित आहे. मी त्यांना एवढे सांगू इच्छिते की, ते माझे तोंड बंद करु शकत नाही. मी बोलत राहणार असे महविश हयातने म्हटले आहे.
-
काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारावर मी नेहमीच आवाज उठवत राहीन आणि त्यासाठी बॉलिवूडला ढोंगीसुद्धा म्हणेन. पुढच्यावेळी तुम्हाला कोणासोबत माझे नाव जोडायचे असेल तर मी तुम्हाला सुचवू शकते ? असे महविशने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
-
महविश हयात त्या पाकिस्तानी अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडले जाते. मीडिया रिपोर्टनुसार महविश हयात सारख्या अभिनेत्रींसाठी दाऊद पाकिस्तानातील सिनेमांमध्ये प्रचंड पैसा गुंतवतो.
-
थेट पंतप्रधानांपर्यंत ओळख असल्याने मागील वर्षीच्या देशातील नागरी पुरस्कारांपैकी तमगा-ए-इम्तियाज हा पुरस्कार मेहविशला देण्यात आल्याचे सांगितले जाते.
Mira Bhayandar Land Scam: “मी राज्याचा मंत्री आहे त्यामुळे…”, ३०० कोटींची जमीन लाटल्याच्या आरोपावर प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण