अभिनेता सलमान खान याने आजवर अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. यातील अनेक जण यशस्वी कलाकार झाले. तर, काही कलाकार मात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरण्यास अपयशी ठरले. ( सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस) यात भाईजानने बॉलिवूडमध्ये लाँच केलेल्या अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर मात करतात. मात्र अभिनयाच्या बाबतीत त्या अपयशी ठरल्या आहेत. सलमान खानच्या 'लकी' चित्रपटातून स्नेहाने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे स्नेहाचा चेहरा अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसारखाच दिसतो असंही अनेकांनी म्हटलं होतं. बॉलिवूडमध्ये फारशी प्रसिद्ध न मिळाल्यामुळे स्नेहाने आता तिचा मोर्चा तेलुगू आणि बंगाली चित्रपटांकडे वळवल्याचं दिसून येतं. डेजी शाह – 'जय हो' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे डेजी शाह. या चित्रपटात अभिनेता सलमान खानदेखील मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकला नाही. या चित्रपटानंतर डेजीचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. झरीन खान- अभिनेत्री कतरिना कैफप्रमाणे दिसणाऱ्या झरीन खानने 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सलमान खान आणि सोहेल खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. वीर या चित्रपटानंतर झरीनने अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. मात्र तरीदेखील प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविण्यास ती अपयशी ठरल्याचं दिसून येतं. सोनाक्षी सिन्हा – 'दबंग गर्ल' म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर सोनाक्षीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. सोनाक्षी ही अभिनेता शत्रूघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. अथिया शेट्टी – अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी हीदेखील अभिनेता सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. परंतु, अथियाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. अथियाने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटातदेखील काम केलं होतं. मात्र तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. भूमिका चावला – आज प्रेक्षकांच्या मनात घर केलेला चित्रपट म्हणजे 'तेरे नाम'. अभिनेता सलमान खान आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका असलेला 'तेरे नाम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. परंतु, या भूमिका चावलाला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. 'तेरे नाम'नंतर भूमिका चावलाचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला. सध्या भूमिका तिचा सर्वाधिक वेळ घरातल्यासोबत व्यतीत करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ramdas Kadam : ‘माझ्या पत्नीने जाळून घेतलं नव्हतं, तर…’, अनिल परबांच्या आरोपांना कदमांचं प्रत्युत्तर; कोर्टात खेचण्याचा दिला इशारा