-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री जेनिफर विगेट हिची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने बिग बॉसकडून ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसमध्ये भाग घेण्यासंदर्भात तिला विचारण्यात आलं होतं. परंतु तिने आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस १४ मध्ये भाग घेण्यासाठी जेनिफरला जवळपास तीन कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. मात्र तरीही जेनिफरने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी नकार दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेनिफर विगेट छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेनिफरने २००३ साली शाका लाका बुम बुम या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर कुसुम, कार्तिका, कभी तो होगा, क्या होगा निम्मो का? संगम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र तिला खरी लोकप्रियता मिळाली ती कसौटी जिंदगी की आणि दिल मिल गये या मालिकांमुळे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेनिफर गेल्या काही काळात बेहद या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिने एका खलनायिकेची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयासोबतच जेनिफर सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेनिफर विगेट (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”