-
‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमण सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच त्याने पत्नी अंकिता कोनवारचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit – Instagram)
-
नुकताच मिलिंदने अंकिताचा २९वा वाढदिवस साजरा केला.
-
त्यासाठी मिलिंदने कुटुंबीयांसाठी पार्टी आयोजित केली होती.
-
ही पार्टी मिलिंदने घरातच ठेवली होती.
-
दरम्यान अंकिताने राखाडी रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला होता. तर मिलिंदने डेनिम शर्ट परिधान केला होता.
-
अंकिताने तिचा २९वा वाढदिवस खास बनवण्यासाठी २९ किमी रनिंग केली आहे.
-
वाढदिवस साजर करतानाचे फोटो शेअर करत फॅमिली टाइम! माझी पत्नी अंकिता कोनवारला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. यंदाचे वर्षे आपल्यासाठी कठिण होते पण ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळल या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
-
अंकिता आणि मिलिंदने २०१८ मध्ये लग्न केले.
-
मिलिंदने त्याचे नाते जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडले.
-
अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले पण तरीही मिलिंद आणि अंकिताने त्यांच्यातील प्रेमातून सर्वांची तोंडे बंद केली.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…