कोणत्याही कारणाने बिघडलेला शरीराचा आकार प्लास्टिक सर्जरीने पुन्हा प्राप्त करता येतो असे म्हटले जाते. त्यामुळे रंग उजळवण्यासाठी, चेहरा खुलवण्यासाठी केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी, अधिक तरुण दिसण्यासाठी व सिनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी अनेक कलाकार या प्लास्टिक सर्जरीची मदत घेतात. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, श्रुती हसन, वाणी कपूर, कंगना रणौत यांसारख्या शेकडो अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली आहे. परंतु या शेकडोंमधील काही अशाही आहेत ज्यांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे आपले फिल्मी करिअर गुंडाळावे लागले. काहींना तर ओळखणेही कठीण झालं. नैसर्गिक सौंदर्यतर यांचं गेलेच पण प्लॅस्टिक सर्जरीवरुन यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. जाणून घेऊयात अशाच अभिनेत्रींबद्दल… बॉलिवूडमधील प्लॅस्टिक सर्जरीबद्दल विषय़ निघाल्यास वॉन्टेड गर्ल आयशा टाकियाचं नाव निघतेच. लग्नानंतर आयशा टाकिया चित्रपटातून गायबच झाली. पण एका कार्यक्रमादरम्यान कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर आयशानं सर्वानां धक्काच दिला होता.. सर्जरीनंतर आयशाचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत होते. या फोटोवरुन पहिल्याच क्षणात ही आयशाच आहे हे ओळखणेहं कठीण झालं होते. कारण चुकीची सर्जरीमुळे लूक आणि चेहरा पूर्णपणे बदलला होता. लोकांनी आयशाला यावर खूप ट्रोल केलं होतं. याप्रकरानंतर आयशाला चित्रपटात ऑफर मिळणं बंद झालं. २००७ साली कोयनाने आपल्या नाकाची शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकाच हिंदी चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बॉलिवूड निर्मात्यांनी तिच्या विचित्र दिसणाऱ्या नाकामुळे तिला काम देण्यास नकार दिला अशी चर्चा होती. -
नाकावर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे तुझे फिल्मी करिअर संपले अशी चर्चा आहे या बाबत तुला काय वाटते? असा प्रश्न कोयनाला एका मुलाखतीत विचारण्यात आला.या प्रश्नावर “कुठल्याही प्रकारच्या मुलाखतीमुळे माझी सिनेकारकिर्द संपलेली नाही. खरं तर मी स्वत:च भारतीय अभिनयसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हे माझे आयुष्य आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर मी कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करेन त्याबाबत इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही.” अशा शब्दात कोयनाने उत्तर दिले.
-
अभिनेत्री राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतेच. सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार या वक्तव्यामुळे राखी नुकतीच चर्चेत आली होती. राखीला प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता.
राखी सावंतने आतापर्यंत अनेक प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. त्यामुळे ट्रोलर्सनं राखीला 'प्लास्टिक की दुकान' असंही म्हटलं आहे. 'अग्निचक्र' मधून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणाऱ्या राखीनं स्वतला आणखी सुंदर करण्यासाटी प्लॅस्टिक सर्जरीचा सहारा घेतला. मात्र, अनेक सर्जरी झाल्यामुळे चेहरा बिघडला अन् काम मिळणं बंद झालं. -
कमल हासन यांची मुलगी व अभिनेत्री श्रुती हासन फक्त बॉलिवूडचं नव्हे तर दाक्षिणात्या चित्रपटातही आपली वेगळी अशी जागा तयार केली आहे. श्रुती हसनच्या सौंदर्याचं अनेकजण दिवाने आहेत.
-
श्रुती हसननेही प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तिने स्वत याबद्दल माहिती दिली होती. श्रुतीने आपल्या नाकाची सर्जरी केली होती. आधीचा आणि आताचा फोटोची तुलना कराल तर तुम्हाला फरक जाणवेल
इंस्टाग्राम स्टार सहरने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी अनेकदा सर्जरी केली अन् आपला चेहरा बिघडवला. २०१७ मध्ये तब्बल ५० सर्जरी केल्या होत्या.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?