-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
मात्र ही टीका अभिनेत्री मिनिषा लांबाला आवडलेली नाही. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
"आपण सुशिक्षित नागरिकांप्रमाणे वागायला हवं", असा सल्ला तिने टीकाकारांना दिला आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
मिनिषा लांबाने ट्विटरच्या माध्यमातून सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
"आपण सुशिक्षित नागरिकांप्रमाणे वागायला हवं. देशातील न्याय व्यवस्था सत्य शोधून काढण्यासाठी सक्षम आहे. उगाचच आपण न्यायाधिश होण्याचा प्रयत्न करु नये." अशा आशयाचं ट्विट करुन तिने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मिनिषाचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)
-
या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. (फोटो सौजन्या इन्स्टाग्राम)

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण