-
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा आज ३ सप्टेंबर रोजी ४४ वा वाढदिवस आहे.
-
विवेकचा जन्म १९७६ साली ओबेरॉय कुटुंबामध्ये झाला.
-
२००२मध्ये विवेकने राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
या चित्रपटासाठी त्याला फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट डेब्यू अवॉर्ड' देण्यात आला होता.
-
-
त्यानंतर विवेकने ‘काल’, ‘मस्ती’, ‘प्रिन्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
मात्र त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
त्यानंतर त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
पण त्याला तिकडेही फारसे यश मिळाले नाही.
-
आज विवेक चित्रपटांपासून लांब असला तरी त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
-
विवेकचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे.
-
त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट आहे.
-
त्याच्याकडे जवळपास ११० कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
तसेच तो एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल