-
जगभरात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केलं आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून चक्क बिटकॉईनची मागणी केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे त्यानंतर आणखी एक ट्विट करण्यात आलं त्यामध्ये हे ‘हे अकाऊंट जॉन विकने (hckindia@tutanota.com) हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक नाही केला, असं म्हटलं गेलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'जॉन विक' या नावाने नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. हा जॉन विक आहे तरी कोण? पाहुया या फोटो गॅलरीमध्ये… (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जॉन विक ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. फँडम कंपनीने एका क्राईम बेस कॉमिक सीरिजसाठी ही व्यक्तिरेखा निर्माण केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कथानकानुसार जॉन विकचं खरं नाव 'जॉनथन विक' असं आहे. तो एक अट्टल गुन्हेगार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आतापर्यंत त्याने हातात घेतलेलं कुठलंच काम अर्धवट सोडलेलं नाही अशी त्याची ख्याती आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पण एक दिवस तो हे गुन्हेगारीचं जग सोडून निवांत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. परंतु त्याच्या साथिदारांना मात्र हा निर्णय आवडत नाही ते पुन्हा त्याला गुन्हेगारीकडे वळण्यासाठी प्रवृत्त करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर जॉन विक आपल्याच साथिदारांच्या हत्या कशा करतो हे जॉन विकच्या एकंदरीत कथानकात दाखवण्यात येतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याच कथानकात थोडेफार बदल करुन एक चित्रपट मालिका देखील तयार करण्यात आली. या सीरिजचं नाव देखील 'जॉन विक' असंच आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटांमध्ये अभिनेता कीनू रीव्स याने जॉन विकची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गुन्हेगारांचं जग, त्यांचे नियम, काम करण्याची पद्धत, धमाकेदार अॅक्शन आणि थ्रीलर सिक्वेंसमुळे हे चित्रपट तुफान लोकप्रिय झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'जॉन विक' सीरिजमध्ये आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. खरं तर ही सीरिज तीन चित्रपटानंतर संपणार होती परंतु प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता चौथा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्टाईलीश लूक आणि फाईटिंग करण्याची अनोखी शैली यामुळे जॉन विक अॅक्शनपट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आश्चर्याची बाब म्हणजे या काल्पनिक व्यक्तिरेखेचं नाव वापरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अकाउंट हॅक करण्यात आलं. या प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना इंग्रजी आक्रमणांमध्ये…”