-
क्राईम ब्रँचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या कारवाईत पोलिसांच्या हाती एक डायरी देखील लागली. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी पोलिसांनी तिला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु ती चौकशीसाठी गैरहजर राहिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे सोशल मीडियाद्वारे तिच्यावर जोरदार टीका केली जात होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अखेर वाढत्या टीकेमुळे रागिनीने पोलिसांची माफी मागत चौकशीत सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"बुधवारी मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तशी मला नोटिस देखील मिळाली होती. पण इतक्या कमी वेळेत चौकशीसाठी पोहोचणं मला शक्य नव्हतं. मी कायद्याचा आदर करते. आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करेन." अशा आशयाचं ट्विट करुन रागिनीने पोलिसांची माफी मागितली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
राघिनीसोबतच तिचा मित्र रवीशंकर याला देखील नोटिस पाठवण्यात आली होती. परंतु तो देखील चौकशीसाठी गैरहजर राहिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री रागिनी द्विवेदी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा