अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्यात ड्रग्सचा अँगल समोर आला. त्याचा तपास आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत आहे. तर दुसरीकडे ड्रग्सच्या वापराचा तपास कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही सुरू आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सेंट्रल क्राइम ब्रांचने (सीसीबी) चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. रागिनीचा मित्र रवी यानं अटकेनंतरच्या चौकशीत रागिनीचं नाव घेतलं. त्यामुळे पोलिसांनी तिला समन्स बजावले. बुधवारी सीसीबीने रागिनीने समन्स बजावल्यानंतर तिने वकिलांमार्फत सोमवारपर्यंत वेळ मागितली. मात्र त्यापूर्वीच शुक्रवारी पहाटे सहा वाजता सीसीबीने बेंगळुरू इथल्या रागिनीच्या घरी छापेमारी केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणी तीन जणांना अटक केली होती. हे तीन जण कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्यांना व गायकांना ड्रग्स पुरवायचे. रागिनीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला असून २००९ मध्ये तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केम्पे गोवडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा या चित्रपटांमधील भूमिकांमुळे ती प्रकाशझोतात आली. रागिनीनं काही दिवसांपूर्वीच ड्रग्सबद्दल ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये तिने ड्रगसारख्या समस्येचं लवकरच समाधान व्हायला हवं असं म्हटलं होतं. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, रागिनी द्विवेदी)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल