-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सध्या अतिशय लोकप्रिय आहे. नुकताच मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाली आहे. मालिकेती प्रत्येक पात्र हे नेहमीच चर्चेत असतं. पण या सुपरहिट मालिकेतील कलाकार एका भागासाठी किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया 'तारक मेहता..'मधील कलाकरांच्या मानधनाविषयी…
-
मालिकेत जेठालाल हे पात्र विशेष चर्चेत असते. अभिनेते दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत असून ते एका भागासाठी जवळपास १.५ लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
तारक मेहता हे पात्र शैलेष लोढा यांनी साकारले आहे. ते एका भागासाठी जवळपास १ लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
आत्माराम तुकाराम भिडे हे पात्र मंदार चांदवडकर साकरत आहेते. ते एका भागासाठी ८० हजार रुपये मानधन घेत आहेत.
-
अतिशय सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री मुनमुन दत्ताने मालिकेत बबिताचे पात्र साकारले आहे. ती एका भागासाठी ३५ ते ५० हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
जेठालालचे वडिल चम्पकलाल यांची भूमिका अमित भट्ट यांनी साकारली आहे. ते एका भागासाठी ७०-८० हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी एका भागासाठी जवळपास १.५ ते २ लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
बबिताचे वडिल कृष्णन अय्यर यांची भूमिका अभिनेते तनुज महाशब्दे यांनी साकारली आहे. जेठालाला आणि अय्यर यांच्यातील संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. तनुज एका भागासाठी जवळपास ६५ ते ८० हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक एका भागासाठी २८ हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
मालिकेत टप्पू सेनेतील प्रत्येक कलाकाराचे मानधन हे वेगवेगळे आहे. टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता १० हजार घेतो तर गोली आणि गोगीची भूमिका साकारणारे ८ हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?