माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी रुचिरा जाधव सोशल मीडियावर सतत आपले फोटो पोस्ट करत असते. जाणून घेऊयात रुचिरा जाधवबद्दल रुचिराने पराग विद्यालयातून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचं शिक्षण घेतलं. कलर्स मराठी वाहिनीवरील 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. 'प्रेम हे', 'बे दुणे दहा', 'माझे पती सौभाग्यवती' अशा काही मालिकांमध्येही ती झळकली. मालिकांशिवाय रुचिरानं नाटक आणि चित्रपटातही काम केलंय. 'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे. शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केलंय. इन्स्टाग्राम खात्यावर रुचिराचे बरेच ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहायला मिळतात. रुचिरा जितकी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ग्लॅमरस दाखवली आहे तितकीच ती ख-या आयुष्यातही 'बोल्ड आणि ब्युटिफुल' आहे. रुचिरा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले एकाहून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. -
फोटो सौजन्य – https://www.instagram.com/ruchira_rj/

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग