-
अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची 'गुड न्यूज' चाहत्यांना दिली. त्यानंतर अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
-
'गुड न्यूज' देताना अनुष्काने परिधान केलेला पोलका डॉट फॅशनचा ड्रेस मीम्सचा विषय ठरला. आता त्याच पॅटर्नसारख्या ड्रेसमध्ये मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिने फोटोशूट केलं आहे.
-
सोनालीने या फोटोसोबत कॅप्शनसुद्धा मजेशीर दिलं आहे. 'माझ्याकडे कोणतीच गोड बातमी नाही', असं मजेशीरपणे म्हणत सोनाली हा फोटो पोस्ट केला आहे.
-
डेनिम फॅशनसुद्धा कधीच जुनी होऊ शकत नाही हे सोनालीने या फोटोतून सिद्ध केलं आहे.
-
सोनालीचा हा ड्रेस पोलका डॉट पॅटर्नचा नाही तर त्यावर वेगळी डिझाइन आहे.
-
देशभरात लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी सोनाली दुबईला गेली होती. पण तेव्हाच लॉकडाउन जाहीर झाल्याने ती दुबईतच अडकली होती.
-
दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली मुंबईला परतली.
-
मुंबईत आल्यानंतर सोनालीने हे पहिलंच फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
-
तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून, चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
(छायाचित्र सौजन्य- सोनाली कुलकर्णी, इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल