-
करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला करोनाची लागण झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच तिच्यावर उपचार सुरु आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मला कोरोनाची लागण झाली आहे. मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने माझ्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा." अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सारा खानने करोना झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 या लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री सारा खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?