-
मराठी कलाविश्वातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठीचे दुसरं पर्व गाजवलेला हा अभिनेता आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. (फोटो सौजन्य : शिव ठाकरे इन्स्टाग्राम)
-
अमरावतीमध्ये लहानाचा मोठा झालेल्या शिव ठाकरेकडे आज कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अनेक वेळा सोशल मीडियावर त्याची चर्चा असते.
-
फिटनेस फ्रिक असलेल्या शिवचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तोदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असतो.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
-
अलिकडेच त्याने काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फिटनेस ही एक प्रकारची साधनाच असल्याचे मराठी ‘बिग बॉस सीझन २’चा विजेता शिव ठाकरे म्हणतो.
-
फिटनेससाठी नृत्याचा फार चांगला उपयोग करून घेता येतो, असे तो सांगतो. त्याला स्वत:ला नाचण्याचे भयंकर वेड आहे. शिव पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?