-
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. (सर्व फोटो – अपूर्वा नेमळेकर, इन्स्टाग्राम)
-
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला होता.
-
शेवंता म्हणजेच अपूर्वा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा ती आपले हटके लूकमधले फोटोसही शेअर करत असते.
-
नुकातेच तिनं पाढऱ्या ड्रेसमधील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंतीही मिळत आहे.
-
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शेवंता जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यातदेखील ती तितकीच सुंदर आहे.
-
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.
-
ती उच्च शिक्षित असून व्यवस्थापनशास्त्रातील पदवीनंतर एमबीए करण्याचा मानस असलेल्या अपूर्वाने स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली.
-
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत असतानाच दुसरीकडे अपूर्वाने अभिनय करणे सुरुच ठेवलं.
-
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे. व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे.
-
‘झी मराठी’च्या ‘आभास हा’ या मालिकेतून अपूर्वाने अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं होतं.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?