-
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रियाच्या अटकेवरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकर या दोघींमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिबानीने रियाला पाठिंबा देत अंकितावर जोरदार टीका केली. दरम्यान या वादात आता अपर्णा दीक्षित हिने उडी मारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने अंकिताला पाठिंबा देत शिबानीला प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अपर्णा दीक्षित अंकिताची खूप चांगली मैत्री आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन अंकिताला पाठिंबा दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"अंकिताबाबत खूप चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहे. त्यामुळे मी माझ्या मैत्रीणीच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता प्रसिद्धीसाठी कोणावरही टीका करत नाही. ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी उगाचच कोणावरही टीका करण्याची गरज तिला नाही. किंबहुना तिच्यावर टीका करुन काही मंडळी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत." अशा आशयाची पोस्ट लिहून अपर्णाने अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या अपर्णाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अंमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते, असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अटके नंतर रियाची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात प्रतिजन चाचणीचाही समावेश होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘एनसीबी’ने दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे रियाला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी