-
प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेबसीरीजची सध्या बरीच चर्चा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर ही वेबसीरिज आधारीत आहे. एक बाबा लोकांच्या भक्तीचा, श्रद्धेचा कसा स्वत:साठी वापर करुन घेतो, ते या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. (सर्व फोटो सौजन्य – त्रिधा चौधरी इन्स्टाग्राम)
-
बॉबी देओलने या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अनुप्रिया गोएंका, दर्शन कुमार, आदिती पोहनकर आणि त्रिधा चौधरी असे कलाकार आहेत.
-
या वेबसीरीजमध्ये त्रिधा चौधरीची भूमिका विशेष लक्षात राहते. तिच्या वाटयाला जो रोल आला आहे, त्यात त्रिधा छाप उमटवण्यात यशस्वी ठरते.
-
त्रिधा चौधरी हा बंगाली, तेलगु सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे. २०१३ साली त्रिधाने बंगाली फिल्ममधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
-
आश्रमच्या पहिल्या सीझनमध्ये त्रिधा एका गृहिणीच्या भूमिकेत आहे. पण दुसऱ्या सीझनमध्ये तिच्या रोलच्या वेगळया छटा आपल्याला पाहायला मिळतील.
-
'आश्रम'मध्ये सामूहिक विवाहसोहळयापासून तिची भूमिका सुरु होते. सामूहिक विवाहसोहळया तिचा विवाह होतो. त्रिधाच्या नवऱ्याचा आणि त्याच्या बहिणीचा या बाबावर प्रचंड विश्वास असतो. त्रिधाला हे फार पटत नसतं. पण संसारासाठी ती या सगळयाशी जुळवून घेते.
-
एक दिवस आश्रमात कार्यक्रम सुरु असताना 'काशीपूर वाले बाबा निराला' म्हणजे बॉबी देओलच्या ती नजरेत येते. त्यानंतर तिच्या सुखी संसाराला नजर लागते.
-
'काशीपूर वाले बाबा निराला' म्हणजे बॉबी देओल त्रिधाच्या नवऱ्याच्या अतिविश्वासाचा फायदा उचलतो. नवऱ्याच्या याच चुकीमुळे तिचे सुखी संसाराचे स्वप्न भंग पावते आणि तिचा प्रवास एका वेगळया दिशेने सुरु होतो.
-
बंगाली, तेलगु चित्रपटांच्या बरोबरीने त्रिधाने मालिका तसेच 'स्पॉटलाइट', बंदिश बँडिट्स या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
-
आश्रममध्ये त्रिधाने बोल्ड सीन्सही दिले आहेत. पण ती बोल्ड सीन्सपेक्षाही चेहऱ्यावरील तिचे भाव आणि अभिनयासाठी जास्त लक्षात राहते.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…