करोनाचा उद्रेक झाल्यामुळे रद्द करायला लागलेली ट्रिप आठवतेय? आज जग थांबल्यासारखे झाले असताना, एखाद्या हिल स्टेशनवर किंवा समुद्रकिना-यावर सुट्टीसाठी जाण्याचा किंवा उबदार वाळवंटात उंटावरून सफर करण्याचा विचार वास्तवापासून कितीतरी दूर गेला आहे. प्रवासाची आवड असलेल्यांसाठी एक आशेचा किरण मात्र दिसतोय. वीकेंडला डिजिटल स्क्रीन्सच्या माध्यमातून देशातील काही सुंदर स्थळे डोळे भरून बघू शकता. नेत्रसुखद स्थळांवर चित्रीत झालेल्या या वेब सीरिजविषयी जाणून घ्या.. बेबाकी- अल्ट बालाजी आणि झी5 यांची ही एकत्रित वेब सीरिज शिमल्यातील निसर्गरम्य ठिकाणी चित्रीत झाली आहे. यातील पहिलेच दृश्य तुम्हाला हिवाळ्यातील थंड वा-याचा अनुभव देण्यास पुरेसा आहे. या सीरिजमध्ये कुशल टंडन, शिवज्योती राजपुत आणि करण जोतवानी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. काफिर- झी5 वरील ही वेब सीरिज काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आहे. पण प्रत्यक्षात शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आले आहे. ही सीरिज सत्यकथेवर आधारित असून यात कैनाझची भूमिका दिया मिर्झाने साकारली आहे. काश्मीर खोरं, उंचच उंच पर्वतरांगा, खळखळ वाहणाऱ्या नद्या ही सर्व दृश्य सीरिजच्या प्रेमात पडण्यास भाग पाडतात. बॉस- बाप ऑफ द स्पेशल सर्व्हिसेस- अल्ट बालाजीची ही सीरिज शिमल्यातील अविस्मरणीय ठिकाणांवर चित्रीत झाली आहे. यामध्ये इन्स्पेक्टरची भूमिका करण सिंह ग्रोव्हरने साकारली आहे, तर एसीपी साक्षीची भूमिका सागरिका घाटगेने साकारली आहे. बंदिश बँडिट्स- अलीकडेच प्रदर्शित झालेली ही अॅमेझॉन प्राइमवरील वेब सीरिज जोधपूरमध्ये चित्रीत झाली आहे. बंदिश बँडिट्स या सीरिजचे चित्रीकरण प्रामुख्याने बिकानेर व जोधपूर या शहरांमध्ये झाले आहे. अगदी पहिल्या भागापासूनच या सीरिजमधील पारंपरिक राजस्थानी घटकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आर्या- सुष्मिता सेनच्या पुनरागमनामुळे चर्चेत आलेली ही सीरिज डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. याचे संपूर्ण शूटिंग जयपूरमध्ये झाले आहे. यामध्ये सुंदर राजवाडे आणि राजस्थानातील स्थानिक सेट-अप्स दाखवले आहेत. यामध्ये सिकंदर खेर, चंद्रचूड सिंग आणि सुष्मिता सेन हे कलाकार आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत