-
अनेकदा कलाकार हे त्यांच्या आवडीने अभिनय क्षेत्रात करिअर करतात. या करिअरमध्ये त्यांना कधी यश मिळतं तर कधी अपयश. कधी कधी लोकप्रियता मिळूनही कलाकार अभिनयाच्या करिअरला रामराम ठोकताना दिसता. चला जाणून घेऊया अशाच कलाकारांविषयी..
-
सलमान खानसोबत काम केलेली आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खान हिने गुरुवारी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं म्हटलं आहे.
-
तिने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते.
-
यापूर्वी अभिनेत्री झायरा वसिमने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सांगितले होते.
-
‘दंगल’ या चित्रपटासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झालं. आमिर खानने अनेकदा तिच्या अभिनय कौशल्याची स्तुती केली आहे. अभिनयातील इतकं चांगलं करिअर पुढे असतानाही तिने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता.
-
बिग बॉस७मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सोफिया हयात हिने देखील चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. ती एक अभिनेत्री आणि गायिका होती.
-
आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल त्यावेळी अतिशय लोकप्रिय होती. पण एका घटननेनंतर तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
-
९०च्या दशकात सूपर हिट चित्रपट देणाऱ्या ममता कुलकर्णी या देखील बॉलिवूडपासून लांब आहेत.
-
अनेक चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम करणारी बरखा मदन कायम चर्चेत होती. पण तिने अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
-
दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांनी देखील करिअर यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं