-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा शो सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अभिनेत्री सारा गुरपाल हिला मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पहिल्याच आठवड्यात ती 'बिग बॉस'मधून अॅलिमिनेट झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
१४ व्या सीझनमध्ये शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार शोमधील इतर सर्व स्पर्धकांनी मिळून साराविरोधात मतदान केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी तिला 'बिग बॉस'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सारा सोशल मीडियाद्वारे सतत चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु 'बिग बॉस'च्या घरात मात्र ती इतर कलाकारांना तुल्यबळ स्पर्धा देऊ शकली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पहिल्या दिवसापासूनच तिच्याविरोधात वातावरण तयार झालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टास्कमध्येही इतर स्पर्धकांनी तिला बाजूला सारलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे प्रेक्षकही तिला पाहण्यास फारसे उत्सुक नव्हते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी चांगला खेळ सादर न केल्यामुळे साराला 'बिग बॉस'मधून अॅलिमिनेट करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सारा गुरपाल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली