मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कुणाल बेनोडेकरशी तिचा साखरपुडा झाला असून हे दोघं सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सोनालीने कुणालसोबतचे हे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. -
सोनालीचा भाऊसुद्धा त्यांच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात सोनालीने तिचा साखरपुडा उरकला. २ फेब्रुवारी रोजी दुबईत सोनालीचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो तिने वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट केले. लॉकडाउनदरम्यान सोनाली दुबईतच अडकली होती. तिथूनही तिने बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान ती भारतात परतली. सोनालीच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि त्यावेळी कुणालसुद्धा सोबत होता. सोनालीने अद्याप लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही. पण या वर्षाच्या अखेरीस ती लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. -
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सोनाली कुलकर्णी

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…