-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा शो सुरु होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान पवित्रा पुनिया आणि एजाज खान या दोघांमध्ये एक वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यांच्या या बहरणाऱ्या नात्यावर पवित्राचे एक्स बॉयफ्रेंड्स पारस छाब्रा आणि प्रतिक सहजपाल यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मित्रा या बाईच्या नादाला लागू नकोस अन्यथा तुझं करिअर संपेल" असा सल्ला त्यांनी एजाजला दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पारस आणि पवित्रा जवळपास तीन वर्ष एकमेंकांना डेट करत होते. लक्षवेधी बाब म्हणजे पासरला डेट करत असतानाच पवित्रा प्रतिक सहजपालसोबत देखील रिलेशनशिपमध्ये होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पारसने आयएएनएसला आणि प्रतिकने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा डबल डेटिंग करत असल्याचा आरोप केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं असा समज दोघांचाही होता. परंतु बिग बॉसमध्ये इतर स्पर्धकांशी चर्चा करत असताना तिच्या सिक्रेटचं भांडाफोड झालं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पारसने पवित्रावर जोरदार टीका केली. तो म्हणाला, "पवित्रा ही एक अविश्वासू व्यक्ती आहे. स्वत:च्या फायद्यासाठी खोटं बोलण्यात ती पटाईत आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"खरं तर तिचं नाव अवित्र असं ठेवायला पाहिजे होतं. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती आणखी एका तरुणाला डेट करत होती हे सत्य मला या शोमधूनच कळालं." असा आरोप पारसने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय प्रतिकने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत पवित्रावर जोरदार टीका केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आमच्या ब्रेकअपचं खर कारण मला बिग बॉसमुळे कळलं. मला माहित नव्हतं ती एकाच वेळी दोघांना डेट करत होती. आमच्या ब्रेकअपला दिड वर्ष झालं आहे. या दरम्यान मी एकदाही आमचं संभाषण झालेलं नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आमचं रिलेशनशिप ही खासगी बाब आहे पण या गोष्टी आता ती नॅशनल टेलिव्हिजवर बोलतेय याचं मला खूप दु:ख होतंय. अशी टीका प्रतिकने या मुलाखतीत केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान दोघांनीही एजाज खानला पवित्रा पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

२१ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ