बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता फराज खान सध्या रुग्णालयात दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. फराजकडे उपचारासाठी पैसे नसून अभिनेत्री पूजा भट्टने सोशल मीडियाद्वारे मदतीची विनंती केली होती. एकेकाळी फराज खानच्या आजारपणामुळेच सलमान खान सुपरस्टार झाला होता. ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटासाठी सलमान खानच्या आधी दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी फराज खानला साइन केलं होतं. फराज खानने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांतच त्याची तब्येत बिघडली आणि अखेर चित्रपटात दुसऱ्या अभिनेत्याला स्थान देण्याचा निर्णय सुरज बडजात्या यांनी घेतला. फराजनंतर सूरज यांनी सलमानला या चित्रपटाची ऑफर दिली आणि त्याने ती स्वीकारली. सलमानच्या करिअरमध्ये 'मैंने प्यार किया' या चित्रपटाचा किती मोठा वाटा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरीकडे ज्या अभिनेत्याच्या आजारपणामुळे सलमानचं नशिब चमकलं, तो फराज आज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आता सलमानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते. फराज खान हा अभिनेते युसूफ खान यांचा मुलगा आहे. -
फराज सध्या बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा