-
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.
-
रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंह याच्याशी येत्या २४ ऑक्टोबर रोजी नेहा लग्नगाठ बांधणार आहे.
-
लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नेहाच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
नेहा आणि रोहन दिल्लीत लग्न करणार असून गुरुवारी नेहाचं संपूर्ण कुटुंब मुंबईहून दिल्लीला रवाना झालं.
-
दिल्लीला पोहोचताच नेहाच्या मेहंदी व हळदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
-
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदी व मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते नेहावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
२० ऑक्टोबर रोजी नेहाचा रोका पार पडला.
नेहा कक्करने 'दिलबर रिमिक्स', 'मनाली ट्रान्स', 'काला चष्मा', 'आँख मारे रिमिक्स' यांसारखी गाणी गायली आहेत. तरुणाईमध्ये ती फार प्रसिद्ध आहे. रोहन प्रीत सिंगसुद्धा गायक असून 'मुझसे शादी करोगे' या रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला होता. -
या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते.
-
तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.
-
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना नेहा लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे.
यापूर्वी नेहा गायक आदित्य नारायणशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इंडियन आयडलच्या सेटवर त्यांच्या दोघांमधील मैत्री आणि मजा मस्तीपाहून या चर्चा रंगल्या होत्या. -
नेहाने अभिनेता हिमांश कोहलीला डेट केलं होतं.
-
हिमांशसोबतच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर खूप झाली होती.
-
ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर काही आरोपसुद्धा केले होते.
-
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, नेहा कक्कर

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”