-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या यादीत आता टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिचं नाव देखील जोडलं गेलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२९ वर्षीय प्रीतिका चौहान एक टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिमाचल प्रदेशमधील करसोग इथे तिने तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभ्यासासोबतच तिला अभिनयाची देखील आवड होती. त्यामुळे महाविद्यालयांमधील नाटकांमध्ये भाग घेत तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१५ मध्ये तिला 'सावधान इंडिया' या मालिकेत काही लहान-मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पुढे तिचं अभिनय कौशल्य पाहून 'सीआयडी', 'संकटमोचन महाबली हनुमान' यांसारख्या काही लोकप्रिय मालिकांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'देवो के देव महादेव' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मात्र गेल्या काही काळात ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुंबई पोलिसांनी वर्सोवा येथे सापळा रचून प्रीतिकाला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रीतिका चौहान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर