-
लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूर-२ प्राइम व्हिडीओ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमधील कालीन भय्या, मुन्ना त्रिपाठी, गुड्डू पंडित आणि गोलू गुप्ता यांची आधीपासूनच चर्चा होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये या व्यक्तीरेखांबरोबर मुन्ना त्रिपाठीची पत्नी माधुरी यादवची जोरदार चर्चा आहे. (सर्व फोटो सौजन्य – ईशा तलवार इन्स्टाग्राम)
-
ही माधुरी यादवची भूमिका नेमकी कोणी साकारली आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. माधुरी यादवची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे, ईशा तलवार.
-
ईशा तलवारला अजून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली नसली, तरी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत मात्र तिने बऱ्यापैकी नाव कमावले आहे.
-
ईशाने २०१२ साली मल्याळम चित्रपटातून डेब्यु केला. मल्याळम शिवाय तिने तेलगु आणि तामिळ चित्रपटातही काम केले आहे.
-
ईशा तलवारचे वडिल विनोद तलवारही अभिनेते आहेत. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर ईशाने कोरियोग्राफर टेरेंस लुईसच्या नृत्य अकादमीत प्रवेश घेतला.
-
ईशा बेले, जॅज, हिपहॉप, सालसा अशा अनेक नृत्य प्रकारात पारंगत झाली. त्यानंतर डान्स स्टुडिओमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे.
-
अनिल कूपर आणि ऐश्वर्या रायच्या 'हमारा दिल आपके पास हैं' चित्रपटातून तिने बाल कलाकार म्हणून काम केले आहे. त्यानंतर सलमान खानच्या ट्यूबलाइटमध्येही तिने छोटी भूमिका साकारली आहे.
-
ईशाने मिर्झापूर-२ मध्ये माधुरी यादव ही मुख्यमंत्र्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. फार मोठा रोल नसला, तरी तिने तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.
-
ईशाने साकारलेली माधुरी यादव प्रेक्षकांच्या चांगली लक्षात राहते. मुन्ना यादवच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे बिनधास्त वागणे तिला भावते. त्यात ती मुन्नाच्या प्रेमात पडते. माधुरीने मिर्झापूर-२ मध्ये अनेक हॉट सीन्सही दिले आहेत.
-
मिर्झापूर-२ मध्ये तिने चेहऱ्यावरील हावभाव आणि डायलॉगचा टायमिंग अचूकतेने साधला आहे. कदाचित मिर्झापूर-३ मध्ये तिची मोठी आणि महत्त्वाची भूमिका असू शकते. कारण दुसऱ्या सीझनमध्ये ती मुख्यमंत्री दाखवली आहे.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…